या कार्यक्रमात दिसलेली एकता, शिस्त आणि आत्मभाव — हेच आमच्या संघटनेचं खरं बळ आहे.
धुळे जिल्हा अध्यक्ष मा. प्रफुल सर, तालुका अध्यक्षा योगिता येवले मॅडम, आणि त्यांच्यासोबत काम करणारे सर्व विभाग प्रमुख केंद्र प्रमुख— यांनी घेतलेली मेहनत प्रत्येक क्षणी जाणवली. ???? त्यांच्या टीमने सादर केलेले स्वागतगीत आणि आमचे प्रेरणास्थान मा. श्री मनोजकुमार डांगे सर यांच्यावर व SSWF वर श्री चौधरी सरांनी गायलेला पोवाडा — संपूर्ण सभागृहात ऊर्जा आणि अभिमानाचा ज्वार उसळवून गेला. ????????
या कार्यक्रमात तब्बल 170+ केंद्रप्रमुख व विभाग प्रमुख हजर होते — ही उपस्थितीच दाखवते की, आता SSWF चे विचार आणि उद्दिष्टे प्रत्येक गावात रुजत आहेत, फुलत आहेत, आणि जनतेच्या मनात घर करत आहेत.
आजचा दिवस फक्त एक “ओपनिंग” नव्हता तो होता एक नव्या युगाचा प्रारंभ,जेथे प्रत्येक केंद्रप्रमुख एक दीप आहे,आणि त्या प्रकाशाने संपूर्ण समाज उजळणार आहे! ????
???? संपूर्ण शिरपूर टीमचं हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक आभार!SSWF परिवार तुमच्यावर गर्व करतो. ????
Share News